नीट-यूजी परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार होऊन परीक्षेच्या शुचितेला धक्का लागल्याचं दाखवणारा कोणताही पुरावा नसल्यामुळे ही परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय घेतल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या निर्णयामागची कारणं सांगणारा तपशीलवार निकाल न्यायालयानं आज जाहीर केला. या परीक्षा घेण्यासंदर्भात वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयानं आज राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर ताशेरे ओढले. परीक्षार्थींना केंद्र बदलण्याची, चुकीच्या पद्धतीनं नवीन नोंदणी करण्याची परवानगी देणं, चुकीची प्रश्नपत्रिका मिळाल्यानं विद्यार्थ्यांचा वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी त्यांना वाढीव गुण देणं इत्यादी निर्णयांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी टीका केली.
Site Admin | August 2, 2024 7:48 PM | NEET-UG exam | Supreme Court