जलप्रदूषण आणि काँक्रिटीकरणामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीचं आरोग्य बिघडलं असून, गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा, असं आवाहन, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केलं आहे. नाशिक मध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित, गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचे भवितव्य गोदावरी आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे भविष्यातील स्वरूप; या विषयावरील पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या जलसंवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते.
देशभरातल्या नागरिकांचं श्रद्धास्थान असलेला गोदा घाट म्हणजेच रामकुंड हा तरण तलाव बनला आहे, त्याला पुन्हा रामकुंड बनवण्यासाठी नाशिककरांनी पुढाकार घ्यावा, असंही त्यांनी सांगितलं. शासनाकडून मिळणारा १५ हजार कोटीचा निधी नदी परिसरातल्या सुशोभीकरणावर खर्च न होता, नदीचा प्रवाह स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी खर्च व्हावा असं ते म्हणाले. दरम्यान अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत काल गोदाकाठी गोदावरी पूजन आणि महाआरती करण्यात आली. गोदावरी नदीचा प्रवाह शुद्ध ठेवून प्रदूषण रोखण्याचा आवाहन रविशंकर यांनीही नागरिकांना केलं.
Site Admin | January 16, 2025 3:37 PM | गोदावरी | राजेंद्र सिंह
गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा – राजेंद्र सिंह
