डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नागरिकांनी नदी, नाल्यांमध्ये कचरा किंवा राडारोडा न टाकण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं नाल्यातला गाळ काढण्याचं काम नियमितपणे केलं जातं. पावसाळापूर्व काळात मुंबई शहरातल्या लहानमोठ्या नाल्यांतला गाळ काढण्यात आला आहे. परंतु, नाल्यांमध्ये आसापासच्या नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याचं  आढळून येतं. नदी, नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा राडारोडा टाकला तर  पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन जोरदार पावसाच्या वेळी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे एकप्रकारचं  स्वत:हून ओढवून घेतलेलं संकट आहे. त्यामुळे, नागरिकांनी नदी किंवा नाल्यात कचरा, राडारोडा टाकू नये, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आलं  आहे. 

मुंबईत इंद्रानगर तसंच वडाळा ट्रक टर्मिनस इथल्या न्यू म्हाडा ट्रान्झिट कॅम्प भागात असा प्रकार घडल्याचं आढळून आल्यानं पालिकेनं अशा सूचना दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा