डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 20, 2025 7:42 PM | Christopher Luxon

printer

ख्रिस्तोफर लक्सन यांनी मुंबईच्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाला दिली भेट

भारताच्या दौऱ्यावर असलेले न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांनी काल मुंबईच्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली. एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन, एनएमआयसीच्या विपणन प्रमुख जयिता घोष आणि अभिनेते आनंद विजय जोशी यांनी प्रधानमंत्री लक्सन याचं स्वागत केलं.

 

या भेटीत १०० वर्षांचा भारतीय चित्रपटाच्या इतिहासाचं प्रदर्शन असलेल्या गुलशन महलला भेट दिली. यावेळी त्यांनी न्यूझीलंडमध्ये चित्रित झालेल्या कहो ना प्यार है या चित्रपटातल्या एका गीतावर तालही धरला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा