उत्पादक आणि उपभोक्ता राज्यांमधली दराची तफावत दूर करण्यासाठी सरकार वाहतूक आणि साठवणूकीच्या किंमतीचा भार उचलणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे. ते आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी कृषी आणि संबंधित क्षेत्रातला वाढीचा दर साडेतीन ते चार टक्क्यांदरम्यान राहणं अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधान मंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत ११ कोटी शेतकऱ्यांना ३ लाख ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीचं वाटप केल्याचंही त्यांनी सांगितलं. किसान क्रेडिट योजनेनुसार कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्यासारख्या अनेक सुविधा शेतकऱ्यांना पुरवत असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | January 4, 2025 6:31 PM
सरकार वाहतूक आणि साठवणूकीच्या किंमतीचा भार उचलणार- शिवराज सिंग चौहान
