चीननं आज अमेरिकी वस्तुंच्या आयातीवर ३४ टक्के अतिरिक्त शुल्क लादल्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी सुरु केलेलं व्यापारयुद्ध चिघळण्याची आणि मंदी येण्याची भीती वाढली आहे. या दोन आर्थिक महासत्तांमधली तेढ चीननं आणखी काही वस्तुंच्या निर्यातीवर निर्बंध जाहीर केल्यानं, तसंच जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार दाखल केल्यामुळे वाढली आहे. यावर्षाअखेरपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत सापडण्याची शक्यता ४० टक्के होती, ती आता ६० टक्क्यापर्यंत दिसू लागली असल्याचं जे पी मॉर्गननं म्हटलं आहे.
Site Admin | April 4, 2025 8:27 PM | China | US
अमेरिकी वस्तुंच्या आयातीवर ३४ % अतिरिक्त शुल्क लादल्याची चीनची घोषणा
