चीनमध्ये बीजिंग आणि उत्तर भागात आलेल्या वादळामुळे शेकडो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर काही हाय-स्पीड रेल्वे मार्गावरच्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. बीजिंगच्या दोन्ही प्रमुख विमानतळांवर ८३८ उड्डाण रद्द करण्यात आली. बीजिंगमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्याची ही दशकातली पहिलीच वेळ आहे. ताशी १५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे ऐतिहासिक पर्यटन स्थळे देखील बंद आहेत. बीजिंगमध्ये जवळजवळ ३०० झाडं पडली असून त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे.
Site Admin | April 12, 2025 8:03 PM | China | china-storm
चीन बीजिंगमध्ये वादळामुळे ८३८ उड्डाणे रद्द, रेल्वे सेवाही विस्कळीत
