बिहारच्या राजगीर इथे आज झालेल्या महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं. भारतीय संघाने चीनचा १ -० असा पराभव केला. सामन्याचं मध्यांतर होईपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. मध्यंतरानंतर भारताच्या दीपिकाने गोल करत खातं उघडलं आणि तोच भारतासाठी निर्णायक गोल ठरला.
Site Admin | November 20, 2024 6:41 PM | China Open Masters Badminton Tournament | Shenzen