चीनमध्ये आढळून आलेल्या HMPV अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसमुळं चिंता करण्याची गरज नाही. श्वसनाच्या इतर आजारांना कारणीभूत असलेल्या विषाणूंसारखा हा विषाणू आहे असं केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक अतुल गोयल यांनी म्हटलं आहे. यामुळं प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये फ्लू सारखी लक्षणं दिसतात. या आजाराचा सामना करण्यासाठी देशात संपूर्ण तयारी असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | January 3, 2025 8:35 PM | China | HMPV Virus
चीनमध्ये आढळलेल्या HMPV व्हायरसमुळे चितेंचं कारण नाही
