चीनमध्ये तापाच्या साथीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असल्याबद्दलचं वृत्त चीननं फेटाळलं आहे. यंदाच्या हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांचे रुग्ण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले असल्याचंही चीननं म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी ही माहिती दिली. परदेशी नागरिकांकरिता चीनमध्ये प्रवास करणं सुरक्षित असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Site Admin | January 4, 2025 2:43 PM | China | large-scale outbreak of fever
चीनमध्ये तापाच्या साथीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असल्याबद्दलचं वृत्त चीननं फेटाळलं
