डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

चिलीचे अध्यक्ष गॅब्रीएल बोरिक फॉन्ट यांनी आज प्रधानमंत्री मोदी यांची नवी दिल्लीत घेतली भेट

चिलीचे अध्यक्ष गॅब्रीएल बोरिक फॉन्ट यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अध्यक्ष बोरिक त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह आजपासून भारताच्या ५ दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी आज सकाळी त्यांची नवी दिल्ली इथं भेट घेऊन भारत चिली सहकार्याला बळकट करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेबद्दल आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सायंकाळी आयोजित केलेल्या भोजनसमारंभात अध्यक्ष बोरिक उपस्थित राहतील.
पुढील दिवसांच्या कार्यक्रमात अध्यक्ष बोरिक मुंबई आणि बंगळुरू इथे भेट देऊन राजकीय नेते आणि उद्योजकांच्या भेटी घेतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा