बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी बालविवाह प्रतिबंधक ठराव मंजूर केले. गावकऱ्यांनी बालविवाह होणार नाही अशी सामुहिक प्रतिज्ञा ग्रामसभांमध्ये घेतली. या ग्रामसभांमध्ये शाळांचे मुख्याध्यापक, आशा स्वयंसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलिस पाटील, गावातील राजकीय, सामाजिक पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गडचिरोली जिल्हा प्रशासन, जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग तसंच ‘स्पर्श’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत गडचिरोली शहरात बालविवाह मुक्त गडचिरोलीचा संकल्प करून जनजागृती रॅली काढण्यात आली. चंद्रपुरमध्ये बालविवाहाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूनं बालविवाह रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली.