महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येत्या ११ तारखेपासून, तर दहावीची परिक्षा २१ तारखेपासून सुरु होत आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तसंच तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.