नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं कांदा महाबँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. कांद्यावर अणुऊर्जेद्वारे विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल. या बँकेमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. या बँकेसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात यावा,असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या बैठकीला पणनमंत्री अब्दुल सत्तार, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक उपस्थित होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.