डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महिला बचतगट आणि महिला उद्योजकांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप विकसित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी उमेद, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान-एनयुएलएम, महिला आर्थिक विकास महामंडळ-माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी विक्री कक्षांची व्यवस्था करून द्यावी. महानगरांमध्ये असे स्टॉल उभारण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सध्य राज्यात उमेद अंतर्गत सुमारे सहा लाख, एनयुएलएम अंतर्गत ३१ हजार, माविम अंतर्गत ग्रामीण ८७ हजार आणि शहरी ६५ हजार असे एकूण सात लाख ८२ हजार बचत गट कार्यरत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा