डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रजांच्या नावानं अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विख्यात मराठी साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या नावाने मराठी भाषेचं अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल, तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्यासाठी आवश्यक सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात केलं.

 

दिल्ली इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीत ७० वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी साहित्यप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे.अशा संमेलनांच्या माध्यमातून मराठी भाषेचं मोठेपण जगभरातल्या लोकांना कळायला हवं, असं शिंदे यांनी सांगितलं. हे संमेलन सर्वांनी मिळून यशस्वी करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा