डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया-सिडबी कडून स्टार्ट अपसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १हजार स्टार्टअप या कार्यक्रमात उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा