डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ४६,००० विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता मिळणार

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी नाव नोंदणी केलेल्या आणि सध्या विविध आस्थापनांमधे इंटर्नशिप करत असलेल्या ४६ हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यासाठी राज्य सरकार ४२ कोटी रुपये वितरित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत सुमारे ३ लाख ७० हजार प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली असून, १ लाख ७९ हजार ३१८ प्रशिक्षणार्थीना नियुक्ती मिळाली आहे. यामध्ये ८७ हजार १४९ प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत. या योजनेत एकूण १० हजार ५८६ आस्थापनांनी सहभाग नोंदविला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा