उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आलं.
समुद्र मंथनातून आलेला अमृत कलश, प्रयागराजचा संगम आणि त्याचं धार्मिक तसंच भौगोलिक महत्त्व राज्यातला या बोधचिन्हातून दर्शवण्यात आलं आहे. सर्वसिद्धीप्रदाय कुंभ हे या कुंभमेळ्याचं बोधवाक्य आहे. कुंभ मेळ्याला युनेस्कोकडून मानवतेच्या सांस्कृतिक वारशाचा अमूर्त ठेवा अशी ओळख मिळाली आहे.