डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कोणताही अडथळा न येता सुरूच राहील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत कोणताही अडथळा न येता सुरूच राहील, याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ठाण्यात काल झालेल्या एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. लाडकी बहिण योजना बंद करायला महायुती सरकारचा कोणताही विचार नसल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.
मुंबई, ठाणे,पुणे आणि इतर शहरांतल्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाबद्दल उपमुख्यमंत्री शिदे यांनी चिंता व्यक्त केली. २५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित विकास प्रकल्प आता वेळेत पूर्ण केले जातील,असं आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा