पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
मुंबईत २० देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत येत्या १८ तारखेला हा सन्मान सोहळा होणार आहे. तापमान वाढीचं युग संपलं असून होरपळीचं युग सुरू झाल्यानं पर्यावरण रक्षणासाठी त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेनं व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.