राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीपची संधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बालत होते. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के, किंवा किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यादृष्टीनं साठी नियोजन करावं, असं त्यांनी सांगितलं.
उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च आणि तंत्रशिक्षण, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयानं योजनेची अंमलबजावणी करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातली पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातल्या सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजनेअंतर्गत २९ हजार ५०० उमेदवारांच्या नियुक्तीचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी ८ हजार ८४७ उमेदवारांची नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.