महायुती सरकारच्या काळात सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकरी, लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचा होता, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते आज परभणीत प्रचारसभेत बोलत होते.
महायुती सरकारनं साडे सात अश्वशक्ती पम्पाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं, तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला, असं शिंदे म्हणाले.