डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रत्नागिरीत देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

रत्नागिरीत देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ उभारायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी थोड्या वेळापूर्वी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रत्नागिरीत शासकीय विधी महाविद्यालय उभारायलाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचं सामंत यांनी सांगितलं. सागरी विद्यापीठाच्या उभारणीसाठी पाचशे ते सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचा शासन आदेश निघाल्यानंतर त्यासाठी जिल्हाधिकारी ३० दिवसांत रत्नागिरी तालुक्यात ५० एकर जागा उपलब्ध करून देणार असल्याचंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा