पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे प्रस्ताव सादर करावेत; त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, तसंच नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला बाधा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रत्येक गावात पावसाचं प्रमाण, प्रवाहात येणारं पाणी, याबाबत माहिती समजावी यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करावेत, पूरग्रस्त भागात तात्काळ सूचना देणारी प्रणाली कार्यान्वित करावी, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. या सर्व कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
Site Admin | August 6, 2024 8:47 AM | CM Eknath Shinde | Flood | Pune