कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण करत असून विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारसभेत बोलत होते. आपण स्वतःला मुख्यमंत्री नव्हे, तर कॉमन मॅन समजतो असं त्यांनी सांगितलं. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. देशातल्या परकीय गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला ताकद द्यायचं काम महायुतीचं सरकार नक्की करेल असा विश्वास शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारसभेत व्यक्त केला. कोकणचा अनुशेष कोकण विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून भरून काढू अशी ग्वाही त्यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली इथंही एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत आघाडीला कोकणात एकही जागा मिळणार नाही असं शिंदे म्हणाले