डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे वाढवण बंदर राज्यासाठी प्रगतीचं नवं शिखर ठरेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या बंदराची निर्मिती करताना सर्वांचं हित ध्यानात ठेवू, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. वाढवण बंदरामुळे आत्मनिर्भर आणि विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका आणखी मजबूत होईल, असं केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं. 

 

वाढवण बंदरामुळे आर्थिक क्षेत्रात मुंबईचं आघाडीचं स्थान कायम राहील, यामुळे मच्छीमारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. तर बंदरामुळे कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

 

गेल्या १० वर्षात देशातलं मत्स्योत्पादन दुप्पट झालं आहे. १०० हून अधिक देशात भारतातले मासे आणि संबंधित उत्पादनांची निर्यात होते, असं केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह म्हणाले. 

 

या कार्यक्रमाआधी मुंबईत वित्त आणि तंत्रज्ञान विषयक ग्लोबल फिनटेक फेस्टला प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं. शहर आणि गावातली दरी दूर करुन, आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानानं, मोलाची कामगिरी बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा