मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अडवणूक न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं देणं, अर्ज भरून देणं यासाठी महिलांची अडवणूक केली तर कठोर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसंच योजनेचं संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोड अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Site Admin | July 3, 2024 7:38 PM | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अडवणूक न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
