उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. पिंपरी चिंचवड इथं पोलीस आयुक्तालय इमारतीच्या पायाभरणी समारंभात ते आज बोलत होते. राज्यातली होऊ पाहणारी जागतिक गुंतवणूक लक्षात घेता उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करणं आवश्यक असल्याचं फडनवीस म्हणाले. उद्योगांना त्रास दिल्याच्या, खंडणीची मागणी केल्याच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत असून असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असे करणारे महायुतीतल्या घटक पक्षांचे लोक असतील तरीही त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. यावेळी पिंपरी चिंचवडमधल्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आलं. याप्रसंगी विविध सायबर गुन्ह्यांमधे बळी पडलेल्या तक्रारदारांना आरोपींकडून हस्तगत केलेली रक्कम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परत केली गेली. तसंच फडनवीस यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातल्या सायबर विभागातल्या पोलिसांचा सत्कार केला.
Site Admin | February 6, 2025 7:23 PM | CM Devendra Fadnavis
उद्योगांना त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचे निर्देश
