देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात, गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडनवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये ‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ औद्योगिक महोत्सवाचं’ उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या ‘पोलाद क्रांती’चा फायदा या संपूर्ण प्रदेशाला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ वर्षांत गडचिरोली हे देशाचं पोलाद उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. लॉयड्स मेटल’ सारख्या उद्योग समूहांनी गडचिरोलीत उद्योग उभारल्यामुळे नक्षलवादाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला असून, युवा वर्ग रोजगाराच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचं ते म्हणाले. उद्घाटनसत्राला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; उद्योगमंत्री उदय सामंत, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Site Admin | February 7, 2025 7:24 PM | Chief Minister Devendra Fadnavis | Gadchiroli | Minister Nitin Gadkari | Nagpur | Nitin Gadkari
देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन
