पानिपतच्या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. ते आज पानिपत युध्दाला २६४ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पानिपत इथं आयोजित मराठा शौर्य दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्यानं त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, तसंच या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणाही फडनवीस यांनी केली.