सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. पणन विभागाच्या १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. समृध्दी महामार्गालगत ऍग्रो हब उभारा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवा असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
नवी मुंबईत शेतमालासाठी महा बाजार उभारण्याचे नियोजन आहे. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी सांगितले. राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती, कोकणात माशांसाठी तर आदिवासी भागात स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन केली जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. बाजार समित्यांचे उत्पन्नानुसार वर्गीकरण करण्याचंही नियोजन आहे.