महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज नागपूर इथं झालं. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अमरावती, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने ३७३ कोटी रुपये खर्चातून हे उड्डाणपूल बांधले आहेत.
Site Admin | January 5, 2025 7:44 PM | CM Devendra Fadnavis