आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध स्पर्धांमधे चमकदार कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.
महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झालं. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अमरावती, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं ३७३ कोटी रुपये खर्चातून हे उड्डाणपूल बांधले आहेत.
नागपुरातल्या भांगडिया फाऊंडेशनच्या एनएसएच क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नॉसिस सेंटरचं उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांनी केलं.