समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली असून या वर्षाअखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला हे काम सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या घाटशील पारगाव इथं ‘नारळी सप्ताह’ सांगता समारोहात ते आज बोलत होते. कृष्णा कोयनेच्या पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली असून पुढल्या महिन्यात याची निविदा काढली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. अहिल्यानगर आणि साेलापूर दाेन्ही बाजूने उजनी धरणातून तीस टीएमसी पाणी वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून मराठवाड्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी संवाद साधला. राज्यातल्या अनेक भागातली पाणी टंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचं ते म्हणाले.