येत्या पाच वर्षांत राज्यातल्या सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचं दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट २५’ या कार्यक्रमात बोलत होते.
राज्यात गुंतवणुकीसाठी विनाअडथळा सुविधा पुरवल्या जात आहेत. राज्याच्या सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी परिसंस्था तयार केली जात आहे. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करत असून त्यासाठी कौशल्य विद्यापीठ कार्यरत आहे. हरित आणि स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांवरही आम्ही भर देत आहोत, असं ते म्हणाले.
यावेळी इंडिया ग्लोबल फोरमचे संस्थापक मनोज लढवा, तसंच उद्योग क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.