डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सायबर गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज-मुख्यमंत्री

सायबर गुन्हेगारी रोखणं हे सर्वात मोठं आव्हान असून हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं. मुंबई पोलीस दलाच्या विविध उपक्रमांचं लोकार्पण आज देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आझाद मैदान पोलीस ठाण्यातल्या उत्कर्ष सभागृहात झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतल्या सर्व पोलीस ठाण्यांमधे महिला केंद्रित सोयी सुविधा उभारल्या असून पोलीस ठाणे लोकाभिमुख झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

 

महिलांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा यासाठी पोलीस ठाण्यांमधे महिला आणि बाल सहाय्यता कक्ष स्थापन केले आहेत, त्यामुळे महिलांना तक्रार नोंदवताना दडपण येणार नाही याची खात्री असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

 

त्याआधी मुख्यमंत्री फडनवीस आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या नवीन मोटर सायकल, इंटरेप्टर व्हेईकल, फॉरेन्सिक लॅब व्हॅन, निर्भया पथकाच्या व्हॅन यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसेच मुंबईतल्या ८७ पोलीस ठाण्यातील महिला आणि बाल सहाय्यता कक्ष, २१६ पोलीस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेली दूरदृष्य प्रणाली यंत्रणा, पोलीस विभागाचं एक्स हॅन्डल, यांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचं  डी बी मार्ग पोलीस ठाण्यात उद्घाटन करण्यात आलं.  याबरोबर वरळी पोलीस ठाणं आणि गोवंडी पोलीस ठाण्यातल्या  सायबर प्रयोगशाळांचे ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून सायबरच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे कमी कालावधीत सिद्ध करता येणार आहेत.  जगातलं या क्षेत्रातलं अद्ययावत तंत्रज्ञान या प्रयोगशाळांमध्ये उपयोगात आणलं जाणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा