विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी या डेस्कच्या माध्यमातून कार्य केलं जाईल. गुन्हेगारीत अडकलेली अनेक मुलं गरीब, दुर्बल घटकांतली असून त्यांना कायदेविषयक माहितीचं ज्ञान नसतं. या उपक्रमामुळे त्यांना समुपदेशन आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. हा उपक्रम विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाणार आहे.
Site Admin | April 6, 2025 6:22 PM | Chief Minister Devendra Fadnavis
विधीसंघर्षित मुलांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क स्थापन
