मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किलो मीटर मेट्रो कार्यान्वित होतील, असं नियोजन करण्याचे तसंच सर्व मेट्रोमार्गांची कामं पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भविष्यातल्या सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी आतापासूनच कारशेडसाठी जागा आरक्षित करण्याची सूचना त्यांनी केली.
इंदू मिल इथलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण केलं जावं , तसंच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आतापासूनच आराखडा बनवला जावा, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होते.