डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विरोधी पक्षांना बोलण्याची संधी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

अधिवेशनात सर्व विधेयकांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून विरोधी पक्षांना बोलण्याची संधी दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. आपल्याकडे एखादी बातमी आली तरी दुसऱ्याबाजू सहित ती बातमी प्रकाशित करावी, असी विनंतीही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी माध्यमांना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत असून त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांविरोधात निश्चित कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 

 

 

अधिवेशनात विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आपली तयारी असून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अलिखित प्रथेप्रमाणे विरोधकांनी चहापानाला न येण्याचा निर्णय घेतला, अशी टीका पवार यांनी केली. 

 

 

महायुतीला विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान मिळालं असून यामुळे विरोधी पक्षनेता होऊ शकणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महायुती सरकारच्या मागच्या कार्यकाळात वेगाने काम केलं असून महाविकास आघाडी सरकारने बंद पाडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले असं शिंदे म्हणाले. विकासाचा हा वेग या कार्यकाळात वाढेल असा विश्वास त्व्यक्त करत  याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात पडलेलं दिसेल, असं शिंदे म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा