बाबा आमटे यांनी सुरु केलेल्या आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा कॉर्पस फंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. वरोरा इथं आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंचाहत्तर वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यात ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं आहे. आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हेे साध्य करता येईल असं ते म्हणाले. आनंदवनात पाचशेजणांसाठी निवासी रुग्णकेंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. शासकीय अनुदानाच्या रकमेत २०१२ पासून कोणतीही वाढ झालेली नाही असं सांगत अनुदान वाढवल्याची घोषणाही त्यांनी केली.
उद्योग मंत्री उदय सामंतही यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्यावहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना आनंदवनात करण्याची घोषणा यावेळी केली.