जलसंधारणाच्या जुन्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती आणि देखभालीकरिता राज्य शासन नवीन धोरण आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही माहिती दिली. मृद व जल संधारण विभाग आणि विविध संस्था- संघटना यांच्यामध्ये आज तीन सामंजस्य करार करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते. आजवर रखडलेले प्रकल्प नवीन धोरणामुळे प्राधान्यानं पूर्ण होतील, तसंच कमी खर्चात अधिक काम पूर्ण होऊन जलसंधारणाचा प्रभावी वापर होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेसोबत आज झालेल्या सामंजस्य करारांमुळे राज्यातल्या जलसंधारण कामामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढेल, राज्यभरात पाण्याविषयी जनजागृती निर्माण होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.