नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवी दिल्ली इथल्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच देशाच्या राजधानीत हे भव्य संमेलन होत असून ते यशस्वी व्हावं, अशा शुभेच्छाही फडणवीस यांनी दिल्या.