देशाचं डिफेन्स क्लस्टर अर्थात संरक्षण उत्पादनाचं केंद्र महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यात आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यापूर्वी संपूर्ण संरक्षण उत्पादनांचे आयात करणारा आपला देश आज 25 हजार कोटी रुपयांची निर्यात करत आहे. संरक्षण क्षेत्रात जगातील प्रगत देशांमध्ये आपला समावेश होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया- मेक फॉर वर्ल्ड’ ही घोषणा दिल्यानं देशातील नवोन्मेषकांना संधी, व्यासपीठ मिळवून दिली आहे. यात महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे. काळाची पावले ओळखून 2017 मध्ये संरक्षण उत्पादन धोरण तयार केलं, असं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, निबे कंपनीचे अध्यक्ष गणेश निबे यावेळी उपस्थित होते.
Site Admin | February 7, 2025 9:32 AM | चाकण औद्योगिक क्षेत्र | पुणे | मुख्यमंत्री
पुणे हे देशाचं संरक्षण उत्पादनाचं केंद्र असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
