डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

आदिवासींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वसमावेशक आरोग्य धोरण तयार केल जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केल. आदिवासींच्या आरोग्याच्या समस्या दूर करणं, केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं ते म्हणाले. नागपूर इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय ‘फिस्ट-2025’ या परिषदेत ते काल बोलत होते. नागपूर शहर, आदिवासी राजानं स्थापन केलेलं असल्यामुळ, ही परिषद या शहरात होणं याला महत्व आहे, असंही फडणवीस म्हणाले. आदिवासींची पारंपरिक उपचार पद्धती आणि आधुनिक वैद्यकीय कौशल्याचा संगम करूनच, आदिवासींपर्यंत आरोग्य सेवा योग्य पद्धतीनं पोहोचवता येतील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आदिवासी भागांमधील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याच्या दृष्टीन सरकार सातत्याने काम करत असून, त्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा