सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या रविवारी अधिकृतपणे निवृत्त होणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा काल न्यायालयात शेवटचा दिवस होता. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या निकालांमध्ये अयोध्या जमीन वाद, दोन प्रौढांनी सहमतीने ठेवलेल्या समलिंगी संबंधांना मान्यता आणि अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार यांचा समावेश आहे. त्यांचे हे निर्णय समाज आणि राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे होते. चंद्रचूड यांनी ११ नोव्हेंबर २०२२रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
Site Admin | November 9, 2024 3:33 PM | Chief Justice of the country | Dhananjay Chandrachud | retire