महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोकलिंगम यांनी दिला आहे. ईव्हीएम गैरव्यवहारांबद्दल महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांकडून सतत आरोप केले जात आहेत, त्याचवेळी चोकलिंगम यांनी हे विधान केलं आहे. या प्रकरणी अधिकारी सखोल तपास करत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. परदेशात वास्तव्यास असलेल्या आणि ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणारी पत्रं पाठवणाऱ्या सय्यद शुजा यांच्या विरोधात निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केला आहे,असंही चोकलिंगम यांनी स्पष्ट केलं.
Site Admin | December 2, 2024 1:45 PM | EVM | Maharashtra Assembly Election 2024