डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विचारात घेऊ – निवडणूक आयोग

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर दिशानिर्देश विचारात घेऊ, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज सांगितलं. निवडणूक आयोगाचं पथक मुंबई दौऱ्यावर असताना, रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसनं केली होती. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. 

 

शरद पवार यांनी ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह बाद करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र ही मागणी मंजूर केली नसल्याचं आयोगानं आज स्पष्ट केलं. त्याचवेळी शरद पवार यांच्या पक्षानं केलेल्या सूचनेनुसार त्यांच्या तुतारी फुंकणारा माणूस या निवडणूक चिन्हात सुधारणा केल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा