छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलानं बीजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही कारवाई केली. यावेळी त्यांची नक्षलवाद्यांबरोबर चकमक झाली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्रं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.
Site Admin | March 25, 2025 3:10 PM | Chattisgarh
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार
