छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात आणि ओदिशामधल्या नुआपाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईत २३ नक्षलवादी मारले गेले. त्यात नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती याचाही समावेश आहे. त्याच्यावर १ कोटी रुपयांचं बक्षीस होतं.
या कारवाईत ठार झालेल्या दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह काल, तर १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह आज ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एका रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस आज या परिसरात व्यापक शोधमोहीम राबवत आहेत.
नक्षलमुक्त भारत अभियानाच्या दृष्टीने सुरक्षा दलाचं हे मोठं यश असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे, असं शहा म्हणाले.